Home / News / मध्यप्रदेश-राजस्थानसह ४ राज्यांमध्ये दाट धुक्याचा इशारा

मध्यप्रदेश-राजस्थानसह ४ राज्यांमध्ये दाट धुक्याचा इशारा

जयपूर – राजस्थान आणि मध्य प्रदेशसह देशातील ४ राज्यांत दाट धुक्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. जयपूरमध्ये दिवसाही धुके असते. वाढत्या...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

जयपूर – राजस्थान आणि मध्य प्रदेशसह देशातील ४ राज्यांत दाट धुक्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. जयपूरमध्ये दिवसाही धुके असते. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर खैरथळ-तिजारा जिल्ह्यातील सरकारी व खासगी शाळांना २३ नोव्हेंबरपर्यंत राज्य सरकारने सुट्टी जाहीर केली आहे.

मध्य प्रदेशमध्ये भोपाळ-इंदूरसह २८ शहरांमध्ये तापमान सामान्यपेक्षा कमी झाले आहे. तर दिल्ली, पंजाब आणि चंदिगड या उत्तर भारतातील राज्यांमध्ये प्रदूषण वाढले आहे. पंजाबमधील ५ जिल्ह्यांत प्रदूषण पातळी सामान्यापेक्षा ४ पट वाढली आहे. दिल्ली आणि हरियाणातील अनेक शाळांचा अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने सुरु आहे. दुसरीकडे, डोंगरावर बर्फवृष्टी झालेली नाही. परिणामी श्रीनगरमध्ये तापमान ४०.७ अंशांवर नोंदवले आहे. यामुळे वाढते प्रदूषण आणि त्यामुळे वातावरणात होणारे परिवर्तन याबाबत तज्ज्ञ चिंता व्यक्त करत आहेत.

Web Title:
संबंधित बातम्या