मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक

मुंबई- अभियांत्रिकी देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी उद्या मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. सकाळी १० वाजून ५५ मिनिटापासून ते दुपारी ३ वाजून ५५ मिनिटापर्यंत हा मेगाब्लॉक असेल.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून (सीएसएमटी) विद्याविहारकडे जाताना सर्व लोकल रेल्वे या जलद मार्गावरुन चालवल्या जाणार आहेत. भायखळा, परळ, दादर, माटुंगा सायन आणि कुर्ला रेल्वेस्थानक या ठिकाणी लोकल ट्रेन जलद मार्गावर वळवल्या जातील.

सीएसएमटीपासून ते चुनाभट्टी आणि वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११ वाजून ४० मिनिटापासून ते सायंकाळी ४ वाजून ४० मिनिटापर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. चुनाभट्टी ते वांद्रेपर्यंत सकाळी ११ वाजून १० मिनिटे तर सायंकाळी ४ वाजून १० मिनिटापर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरील सकाळी ११ वाजतापासून ते सायंकाळी ४ वाजून ४७ मिनिटांपर्यंत सीएसएमटी ते वाशी , वडाळा, बेलापूर आणि पनवेलसाठी रवाना होणाऱ्या डाउन लोकल ट्रेन रद्द केल्या जाणार आहेत. सीएसएमटीपासून हार्बर मार्गावरुन गोरेगावपर्यंत जाणाऱ्या लोकल ट्रेन सकाळी १० वाजून ४८ मिनिटापासून ते दुपारी ४ वाजून ४३ मिनिटापर्यंत रद्द केल्या आहेत. पनवेल, बेलापूर, वाशीपासून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनचा मेगाब्लॉक सकाळी ९ वाजून ५३ मिनिटे ते दुपारी ३ वाजून २० मिनिटापर्यंत असणार आहे. गोरेगाव वांद्रे अप दिशेने म्हणजे सीएसएमटीकडे जाताना सकाळी १०:४५ ते दुपारी ५ वाजून १३ मिनिटापर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top