मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज मेगाब्लॉक

मुंबई – उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी, 3 डिसेंबर 2023 रोजी रेल्वेच्या मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल. मध्य रेल्वेच्या माटुंगा – मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर, तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर दिवसा कोणातही मेगाब्लॉक नसेल.
मध्य रेल्वेवर माटुंगा-मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 मिनिटांनी मेगाब्लॉक असेल. या दरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या जलद मार्गावरील सेवा तसेच ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. हार्बर रेल्वेवर सीएसएमटी – चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाउन मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.४० या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी, वडाळा येथून वाशी, बेलापूर, पनवेल करता सुटणारी अप आणि डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि वांद्रे, गोरेगाव येथून सीएसएमटीसाठी अप आणि डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहिल. ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला प्लॅटफॉर्म क्र. 8 दरम्यान विशेष सेवा 20 मिनिटांच्या अंतराने चालवल्या जातील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top