मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक

मुंबई

रेल्वेच्या मुख्य मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उद्या रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि विद्याविहार अप-डाऊन मार्गावर गाड्या सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत धीम्या मार्गावर धावतील. सीएसएमटी येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४९ या वेळेत सुटणाऱ्या डाऊन धीम्या रेल्वेगाड्या सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. घाटकोपर येथून सकाळी १०.४१ ते दुपारी ३.५२ पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या सेवा विद्याविहार ते सीएसएमटी दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल. सीएसएमटी – चुनाभट्टी/वांद्रे हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे- सीएसएमटी अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक असेल. सीएसएमटी /वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते दुपारी ४.४७ या वेळेत सुटणारी वाशी/बेलापूर/पनवेल करीताची डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव करीता सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत सीएसएमटीसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत सीएसएमटीसाठी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष रेल्वे गाड्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top