मध्य, पश्चिम रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्याकरिता मध्य आणि पश्चिम रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक असेल. ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत तर पश्चिम रेल्वेवर सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत माहीम ते सांताक्रुझ अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असेल.
सीएसएमटी डाऊन जलद लोकल सेवा ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. कल्याण येथून सुटणाऱ्या अप जलद लोकल कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि मुलुंडपुढे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. पश्चिम रेल्वेवर ब्लॉक कालावधीत सर्व जलद मार्गावरील लोकल माहीम आणि सांताक्रुझ/अंधेरी स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर चालविल्या जातील. ब्लॉक दरम्यान काही लोकल रद्द राहतील. तसेच बोरिवली आणि अंधेरीतील काही लोकल हार्बर मार्गावर गोरेगावपर्यंत चालविल्या जातील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top