मध्‍य प्रदेशच्या काँग्रेस आमदार निर्मला सप्रे यांचा भाजपात प्रवेश

भोपाळ

मध्य प्रदेशच्या बीना मतदारसंघातील काँग्रेसच्या आमदार निर्मला सप्रे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. यानंतर निर्मला यांनी आज भाजपात प्रवेश केला. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या रहाटगड येथील सभेत निर्मला सप्रे यांनी भाजपाचे कमळ हाती घेतले. निर्मला सप्रे यांनी अचानक भाजपामध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसला धक्का बसल्याचे मानले जात आहे.

भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर आमदार निर्मला सप्रे म्हणाल्या की, ‘काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जितू पटवारी यांनी महिलांच्या संदर्भात चुकीचे वक्तव्य केले होते. मीसुद्धा आरक्षित प्रवर्गातील महिला आमदार आहे. त्यांच्या बोलण्याने मी दुखावली आहे. भाजपात प्रवेश केला कारण येथे महिलांचा आदर केला जातो.’ विधानसभा निवडणुकीत निर्मला सप्रे यांनी भाजपाचे उमेदवार महेश राय यांचा ६ हजार हून अधिक मतांनी पराभव केला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top