मध्य प्रदेश काँग्रेसचा नवा चेहरा प्रदेश अध्यक्षपदी जितू पटवारी !

भोपाळ- विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या जागी कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी नवा चेहरा दिला आहे. आता मध्य प्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी ओबीसी नेते असलेले जितू पटवारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.पटवारी हे कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या जवळचे मानले जातात.

स्वातंत्र्यसैनिक कोदारलाल पटवारी यांचे ते नातू आहेत.५० वर्षीय ओबीसी नेते असलेले जितू पटवारी यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९७३ मध्ये बिजलपूरमध्ये झाला आहे.२०१३ मध्ये पहिल्यांदा आमदार झालेल्या पटवारी यांनी देवी अहिल्या विद्यापीठातून बीए आणि एलएलबी केले. २०१८ ते २०२० या काळात ते राज्यमंत्री होते.त्यांचे वडील रमेशचंद्र पटवारी हेसुद्धा कॉंग्रेसमध्ये सक्रिय होते.पटवारी हे सध्या कॉंग्रेस सचिव आणि गुजरातचे प्रभारी आहेत. त्यांनी मध्य प्रदेशच्या युवक कॉँग्रेस अध्यक्षपदी काम केले आहे. २०१८ मध्ये पटवारी यांनी दुसर्‍यांदा राऊळमधून दुसर्‍यांदा निवडणूक जिंकली.मात्र तिसर्‍यांदा म्हणजे २०२३ मध्ये त्यांना पराभवाचा झटका बसला. आमदारकी गेली असली तरी त्यांना पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचे महत्वाचे स्थान मिळाले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top