मध्य रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत

मुंबई
कळवा रेल्वे स्थानकाजवळ लोकलची ओव्हर हेड वायर तुटल्याने आज दुपारी दोन वाजता मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे गोरखपूर एक्सप्रेस आणि बदलापूर लोकल डाऊन जलद लाईनवर रखडली. कल्याण दिशेने जाणारी सर्व लोकल आणि एक्सप्रेस धीम्या लाईनवरुन वळवल्या. लोकल खोंळबल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. मध्य रेल्वेकडून याबाबत कोणतीही माहिती दिली जात नसल्याने प्रवाशांत गोंधळ निर्माण झाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top