मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडून हार्बर मार्गावर प्रवासी सुरक्षेचा आढावा

मुंबई- लोकल ट्रेनच्या मोटरमन कॅबमध्ये फूटप्लेस, ट्रॅक, सिग्नलिंग, ओव्हरहेड इक्विपमेंटची तपासणी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी केली. हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा त्यांनी घेतला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते पनवेल हार्बर मार्गावरील उपनगरीय लोकल ट्रेनच्या मोटरमन कॅबमध्ये फूटप्लेसची तपासणी, पनवेल ते ठाणे या मार्गावरील मागील भागाच्या खिडकीची तपासणी, ट्रॅक, सिग्नलिंग, ओव्हर हेड इक्विपमेंटच्या विविध सुरक्षा पैलूंची तपासणी त्यांनी केली.
या शिवाय फलाटाचा स्लोप काढणे, फलाटाच्या टोकांना सुरक्षा जाळी बसवणे व अवैध पद्धतीने होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी फलाटाच्या टोकांवर ग्रीस लावणे, रुळावरील चिखल काढणे आणि इतर उपाययोजनांच्या विविध बाबींचा त्यांनी आढावा घेतला. पनवेल स्थानक यार्डातून जाणाऱ्या आगामी डेडिकेटेड मालवाहतूक विशेष मार्गाच्या कामाची पाहणीही त्यांनी यावेळी केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top