मध्य रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक

मुंबई

मध्य रेल्वेवर उद्या रात्रकालीन पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातील लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या प्लॅटफॉर्म विस्ताराच्या कामासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. ब्लॉकदरम्यान उद्या रात्री १२.३० नंतर भायखळा ते सीएसएमटी आणि वडाळा रोड ते सीएसएमटी लोकल रविवारी पहाटे साडेचार वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे.

ब्लॉक कालावधीत हावडा-सीएसएमटी सुपरफास्ट एक्सप्रेस, मडगाव-सीएसएमटी जनशताब्दी एक्सप्रेस, मडगाव-सीएसएमटी तेजस एक्सप्रेस, अमृतसर -सीएसएमटी एक्सप्रेस, या गाड्या दादर स्थानकापर्यंत चालविण्यात येणार आहेत.

पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मरीन लाईन्स स्थानकादरम्यान वानखेडे फूट ओव्हर ब्रिजचे मुख्य गर्डर टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी शनिवार आणि रविवारी मध्यरात्री १.१० ते पहाटे ४.१० या वेळेत पश्चिम रेल्वेवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत मुंबई उपनगरीय रेल्वे सेवांवर परिणाम होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top