Home / News / ममता सरकारचे मोठे यश! कोलकात्यात इव्ही चार्जिंग हब

ममता सरकारचे मोठे यश! कोलकात्यात इव्ही चार्जिंग हब

कोलकाता – पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये देशातील सर्वात मोठे इव्ही चार्जिंग हब उभारण्यात येत आहे. म्हणजेच एका छताखाली फार मोठ्या...

By: E-Paper Navakal

कोलकाता – पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये देशातील सर्वात मोठे इव्ही चार्जिंग हब उभारण्यात येत आहे. म्हणजेच एका छताखाली फार मोठ्या संख्येने इ-वाहनांना बॅटरी चार्जिंग करण्याची सोय येथे उपलब्ध असणार आहे.
देशातील हे सर्वात मोठे चार्जिंग हब इझउर्जा ही कंपनी उभारत आहे. ममता सरकारचे हे मोठे यश मानले जात आहे.
इझउर्जाचे व्यवस्थापकीय संचालक अशोक कपूर यांनी सांगितले की, या चार्जिंग हबमध्ये ३०० चार्जिंग पॉइंट असणार आहेत. याचा अर्थ एका वेळी तीन वाहनांना बॅटरी चार्ज करता येईल. हे जगातील दुसरे सर्वात मोठे चार्जिंग स्टेशन असेल. जगातील पहिल्या क्रमांकाचे चार्जिंग स्टेशन चीनमध्ये आहे. चीनच्या चार्जिंग स्टेशनमध्ये ६५० चार्जिंग पॉइंट आहेत.

Web Title:
संबंधित बातम्या

Share:

More Posts