मराठवाडा, कोकणसाठी उन्हाळी सुटीत विशेष गाड्या

मुंबई
उन्हाळी सुटीत गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या सेवेसाठी मध्य रेल्वेने उन्हाळी विशेष गाड्यांबरोबर मेल, एक्स्प्रेसच्या अतिरिक्त फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मराठवाडा, खान्देश आणि कोकणातील चाकरमान्यांना गावी जाण्यासाठी या विशेष रेल्वे गाड्यांचा फायदा होणार आहे.
मुंबई-करीमनगरदरम्यान ९ एप्रिल ते २८ मे पर्यंत दर मंगळवारी १५:३० वाजता विशेष गाड्या सुटून दुसऱ्या दिवशी ८:३० वाजता करीमनगर येथे पोहोचतील. तर परतीच्या गाड्या १० एप्रिल आणि २९ मेपर्यंत दर बुधवारी १९:०५ वाजता करीमनगर येथून सुटून दुसऱ्या दिवशी १३:४० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचतील. या गाड्यांना दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, पूर्णा, नांदेड, मुदखेड, धर्माबाद, बासर, निजामाबाद, आर्मूर, मेटपल्ली, कोरूटला, असे थांबे असतील.
मुंबई मऊ/कोच्चुवेली दरम्यान विशेष गाडी १० एप्रिल आणि १ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २२:३५ वाजता सुटून मऊ येथे तिसऱ्या दिवशी ११:१० वाजता पोहोचेल. तर परतीची गाडी १२ एप्रिल आणि ३ मे रोजी मऊ येथून १३:१० वाजता सुटून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी ००:४० वाजता पोहोचेल. या गाड्यांना दादर, ठाणे कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झासी, उरई, गोविंदपुरी, फतेहपूर, प्रयागराज, जंघई, जौनपूर, शाहगंज आणि आजमगड हे थांबे असतील.
एलटीटी-कोच्चुवेली दरम्यान गाडी ११ एप्रिल ते २७ जूनपर्यंत दार गुरुवारी एलटीटी येथून १६:०० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी २०:४५ वाजता कोच्चुवेली येथे पोहोचेल. तर परतीची गाडी १३ एप्रिल ते २९ जूनपर्यंत दर शनिवारी १६:२० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी २१:५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल. या गाड्यांना ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, मडगाव, कारवार, कुमटा, कुंदापुरा, उडुपी, मंगळुरू जंक्शन, कासरगोड, कण्णूर, कोषिक्कोड, तिरूर, षोरणूर, त्रिसूर आदी थांबे असतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top