मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या

परभणी- मराठा आरक्षण मिळावे यासाठी आणखी एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. परभणी तालुक्यातील सनपुरी येथे एका ३४ वर्षीय युवकाने गळफास लावून आत्महत्या केली.काल शनिवारी पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. सचिन राम शिंदे असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.मयत तरुणाकडे मराठा आरक्षण मिळावे, असा मजकूर लिहिलेली एक चिठ्ठी देखील आढळून आली आहे.”मी सचिन रामराव शिंदे, राहणार परभणी. मराठा आरक्षण मिळत नसल्याने, मी स्वत:ला संपवत आहे.” असे त्याने या चिठ्ठीत लिहिले आहे.तसेच पुढे एक मराठा लाख मराठा असेही लिहिले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top