मराठ्यांनंतर लिंगायत समाज मैदानात! ओबीसीत समाविष्ट करण्याची मागणी

सांगली- शेती करणारा कुणबी या न्यायाने वर्षानुवर्षे शेतकरी असणार्या लिंगायत समाजाचा इतर मागास प्रवर्गात (ओबीसी) समावेश करावा, अशी मागणी करत आज गावागावांतील लिंगायत समाजाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. मराठ्यांना ओबीसीत समाविष्ट करण्याची मागणी होत आहे. असाच न्याय लिंगायत समाजाच्या बाबतीतदेखील झाला पाहिजे, असे त्यांनी म्हटले.
लिंगायत समाजाने आपल्या निवेदनात म्हटले की, लिंगायत समाज हा मागास, अतिमागास, कष्टकरी आहे. तो बाराव्या शतकात उदयास आला. महात्मा बसवेश्‍वरांनी कष्टकरी, बहुजन समाज घटकांना घेऊन लिंगायत धर्माची स्थापना केली. आता मराठा आरक्षणासाठी कागदपत्रे शोधत असताना अनेक ठिकाणी लिंगायत कुणबी, कुणबी लिंगायत, माळी कुणबी, तेली कुणबी, कुंभार कुणबी अशा नोंदी आढळत आहेत. त्यामुळे लिंगायत कुणबी नोंदी सापडणे म्हणजे समाजाची ओबीसीत समावेशाची मागणी रास्त होती, हेच सिद्ध होते. लिंगायत समाज ६५ मागास, अतिमागास घटकांनी बनला आहे. त्यात शेती करणे, शेतीपूरक व्यवसाय करणे हाच मुख्य कामाचा भाग आहे. मात्र, जातिव्यवस्था मान्य नसल्याने अनेक ठिकाणी जातीचा उल्लेख नाही, तिथे लिंगायत असा उल्लेख आहे. आता शासनाच्या लेखी नोंदी आळल्याने सारासार विचार करून लिंगायत समाजाच्या मागणीला न्याय द्यावा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top