मलेशियात २ लष्करी हेलिकॉप्टरचा भीषण अपघात! १० जणांचा मृत्यू

क्वालालंपूर

मलेशियामध्ये नौदलाच्या २ हेलिकॉप्टरची टक्कर झाली. यात १० जणांचा मृत्यू झाला. हा अपघात स्थानिक वेळेनुसार आज सकाळी ९.३२ वाजता झाला. मलेशियाच्या रॉयल मलेशियन नौदलाच्या वार्षिक कार्यक्रमाच्या सरावादरम्यान ही घटना घडली. हा सराव लुमुट येथील रॉयल मलेशियन नौदलाच्या स्टेडियमवर सुरु होती.

या अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नौदलाची दोन हेलिकॉप्टर सराव करीत होती. यावेळी त्या दोघांची हवेतच टक्कर झाली आणि पहिले हेलिकॉप्टर क्रॅश होऊन स्टेडियमच्या पायऱ्यांवर पडले तर दुसरे स्विमिंग पूलमध्ये पडले. मलेशियाच्या नौदलाने या घटनेवर एक निवेदन जारी करून म्हटले की, नौदलाच्या ९० व्या वर्धापन दिनानिमित्त ३ ते ५ मे दरम्यान होणाऱ्या लष्करी परेडसाठी ही हेलिकॉप्टर सराव करत होते. या घटनेत १० जणांचा मृत्यू झाला. या अपघातात ठार झालेले सर्व जण हेलिकॉप्टरचे क्रू मेंबर्स होते. त्यांचे मृतदेह ओळखीसाठी लुमुट एअर बेस रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या घटनेची चौकशी करण्यासाठी प्रशासनाने आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top