मल्ल्याळम अभिनेत्री लक्ष्मीकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

शारजा –
अरब अमिरातीच्या शारजामध्ये २४ वर्षीय मल्ल्याळम अभिनेत्री लक्ष्मीका सजीवनचा आज हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. तिच्या निधनाबदद्ल चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे. ती शारजामधील बँकेत नोकरी करत होती. लक्ष्मीका सजीवनला मल्ल्याळम शॉर्ट फिल्म कक्कामधून ओळख मिळाली. यामध्ये तिने पंचमीची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील कामाचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले होते. लक्ष्मीकाने पुढायम्मा, पंचवर्णथा, सौदी वेलाक्का, उयारे, ओरू कुटनादन ब्लॉग, ओरू यमंदन प्रेमकथा आणि नित्यहरिथा नायगन यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. प्रशांत बी मोल्लिकल दिग्दर्शित कून या चित्रपटात ती शेवटची दिसली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top