मविआला १८०हून अधिक जागा! नाना पटोलेंचा मोठा दावा

मुंबई – येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला शंभरीदेखील गाठणे अवघड होईल. या निवडणुकीत महाविकास आघाडीला १८० पेक्षा अधिक जागा मिळतील, असा दावा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

मनुवादी प्रवृत्तीच्या महायुती सरकारने महाराष्ट्राचा स्वाभिमान गुजरातला गहाण टाकला आहे. भाजपाची सारी व्यवस्था नकली आहे. एकनाथ शिंदे हे राज्य सरकारचे केवळ मुखवटा आहेत. महाराष्ट्रात आमचे सरकार आल्यावर राज्यातील जनतेला आम्ही बऱ्याच बाबी देऊ, असे आश्‍वासन त्यांनी दिले होते. पण त्यातील एकही आश्वासन त्यांनी पाळले नाही. मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात काँग्रेस चांगली कामगिरी करेल असा दावा त्यांनी केला.

Share:

More Posts