मस्क यांच्या स्पेस कंपनीकडून चंद्रावर खासगी मून लँडर जाणार

वॉशिंग्टन –

एलन मस्क यांची स्पेस एक्स कंपनीव्ह मशिन्स’ या खासगी कंपनीने बनवले आहे. फेब्रुवारी महिन्यात स्पेस एक्स कंपनीद्वारे हे लँडर चंद्रावर पाठविले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत अद्याप कंपनीने अधिकृत माहिती दिली नाही. नोव्हा-सी लँडरला चंद्रावर पाठविण्यासाठी ‘स्पेस एक्स’ कंपनीच्या ‘फाल्कन ९’ या क्षेपणास्त्राचा वापर करण्यात येणार आहे. याबाबत अमेरिकेतील हौस्टनमधील ‘इंट्यूटिव मशिन्स’ या कंपनीच्या ‘स्पेस सिस्टम्स’चे उपाध्यक्ष ट्रेंट मार्टिन यांनी माहिती दिली आहे.

उपाध्यक्ष ट्रेंट मार्टिन यांनी सांगितले की, नोव्हा-सी लँडरचे काम आता पूर्ण झाले आह. हे लँडर आता चंद्रावर जाण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. या मोहिमेला ‘आयएम-१’ असे नाव देण्यात आले आहे. फ्लोरिडाच्या केप कॅनव्हरल अंतराळ स्थानकावरून लवकरच हे लँडर चंद्राकडे पाठवले जाईल. मात्र स्पेस एक्स किंवा इंट्यूटिव्ह मशिन्सने याबाबतची तारीख अद्याप निश्चित करण्यात आली नाही. २२ फेब्रुवारीला हे लँडर चंद्रावर पाठविले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत ‘नोव्हा-सी’ लँडरला ‘मॅलापर्ट ए’ असे नाव दिलेल्या चंद्रावरील विवराजवळ लँड केले जाईल. हे ठिकाण चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळच आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top