महाराष्ट्रातल्या किर्तनकार महिलेला अयोध्येचे आमंत्रण

पुणे
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात राहणाऱ्या सुप्रियाताई साठे ठाकूर यांना अयोध्या इथे होणाऱ्या राममंदिरातल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आमंत्रण मिळाले आहे. महिला किर्तनकार म्हणून त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे.
राज्यातल्या पाच साध्वींपैकी किर्तनकार सुप्रियाताई साठे ठाकूर यांना हे आमंत्रण आलेले आहे. ज्ञानोबा, तुकाराम आणि मुक्ताईंची आपल्यावर कृपा असून त्यांच्या कृपेनेच आपल्याला हा सन्मान मिळाला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top