Home / News /  महाराष्ट्रात ‘या’ तारखेपासून सर्व वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य, अन्यथा भरावा लागणार दुप्पट टोल

 महाराष्ट्रात ‘या’ तारखेपासून सर्व वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य, अन्यथा भरावा लागणार दुप्पट टोल

FasTag Rules: टोल नाक्यावर लागणाऱ्या लांबच लांब रांगा टाळण्यासाठी व वेळेची बचत व्हावी यासाठी फास्टॅग प्रणाली सुरू करण्यात आली आहे. 2014...

By: Team Navakal

FasTag Rules: टोल नाक्यावर लागणाऱ्या लांबच लांब रांगा टाळण्यासाठी व वेळेची बचत व्हावी यासाठी फास्टॅग प्रणाली सुरू करण्यात आली आहे. 2014 मध्ये या प्रणालीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली होती. अद्याप देशातील सर्व राज्यात ही प्रणाली अनिवार्य करण्यात आलेली नाही. मात्र, आता महाराष्ट्रात सर्व वाहनांसाठी ही प्रणाली अनिवार्य करण्यात आली आहे.

1 एप्रिल 2025 पासून राज्यातील सर्व वाहनांना फास्टॅगचा वापर करणे अनिवार्य असेल. जी वाहने फास्टॅगचा वापर करणार नाहीत. त्यांच्याकडून दुप्पट टोल आकारला जाणार आहे. फास्टॅग नसल्याने अनेकदा टोल नाक्यावर रोख पैसे द्यावे लागतात. यामुळे टोल नाक्यावर वाहनांची गर्दी होते. त्यामुळे आता सर्व वाहनांना फास्टॅग अनिवार्य करण्यात आले आहे. जुना फास्टॅग असल्यास केवायसी अपडेट करावे लागणार आहे.

अन्यथा फास्टॅग ब्लॅकलिस्ट

खात्यात पुरेसा बॅलन्स नसल्यास  FASTag ब्लॅकलिस्ट केले जाणार आहे. अशा स्थितीमध्ये ड्रायव्हरला टोल-फ्री सिस्टमचा वापर करता येणार नाही व टोल नाक्यावर रोख पैसे भरावे लागतील. एकदा फास्टॅग गाडीवर लावल्यास देशभरातील कोणत्याही टोल नाक्यावर याचा वापर करता येणार आहे. यामुळे चालकांना टोल नाक्यावर रांगेत उभे राहावे लागणार नाही व इंधनाचीही बचत होईल.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या

Share:

More Posts