महालक्ष्मी एक्स्प्रेसलाअपघात रोधक डबे

कोल्हापूर- मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज सुटणार्‍या मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस रेल्वे गाडीला आता अपघातरोधक डबे जोडण्यात आले आहेत.या डब्यांमुळे आता प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे.

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथे लिंक हॉफमैन बुश म्हणजेच अपघातरोधक डबे जोडलेल्या गाडीला हिरवा झेंडा दाखविला. यावेळी खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते.हे
अपघातरोधक डबे बसविण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटनेने केली होती. जुन्या प्रकारातील आणि पारंपरिक पद्धतीच्या डब्यांच्या तुलनेत एलएचबी डब्यांची लांबी आणि रुंदी जास्त आहे.तसेच या डब्यामधील शौचालय आणि बेसिन यांच्या रचनेत सुधारणा करण्यात आली आहे.त्यामुळे प्रवाशांना ये-जा करणे सोयीस्कर होते. तसेच दरवाजाची रुंदी अधिक असल्याने प्रवाशांना सामान घेऊन प्रवास करणे सुकर होते.एलएचबी डब्यांची बांधणी स्टीलने केलेली असून आतून ॲल्युमिनिअमचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वेगाडीचे वजन कमी होते.त्यामूळे रेल्वेगाडीला वेग घेणे अधिक सोपे होते.तसेच अपघातावेळी हे डबे उलटण्याची शक्यता कमी असते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top