महिन्याच्या सुरुवातीलाच एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ!

मुंबई

डिसेंबर महिना सुरू होताच एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. आजपासून इंधन कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात ४१ रुपयांनी वाढ केली आहे. नव्या किमतींनुसार, राजधानी दिल्लीत एका सिलिंडरची किंमत आता १७९६.५०० रुपये झाली आहे, मात्र घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाही.

एलपीजी सिलिंडरचे नवे दर आयओसीएल प्रणालीवर अपडेट करण्यात आले असून हे दर १ आजपासून लागू झाले. दिवाळीपूर्वी इंधन कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत १०३ रुपयांनी वाढवली होती आणि १ नोव्हेंबर रोजी दिल्लीत त्याची किंमत १८३३ रुपये झाली होती, मात्र १६ नोव्हेंबर रोजी छठपूजेपूर्वी त्यावर दिलासा मिळाला आणि सिलिंडरची किंमत ५० रुपयांनी कमी होऊन १७५५.५० रुपये करण्यात आली होती, परंतु आता पुन्हा एकदा या दरात वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे व्यावसायिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top