महिलेची छेड काढली म्हणून भांडुपमध्ये तरुणाची धिंड!

मुंबई- भांडुपमध्ये एका महिलेची छेड काढल्याच्या कारणावरून एका तरुणाला स्थानिक नागरिकांनी बेदम करून त्याची अर्धनग्न धिंड काढली. या धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, या मारहाणीत हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी भांडुप पोलिसांनी या तरुणाच्या विरोधात विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच या तरुणाला मारहाण करणाऱ्या चार जणांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भांडुपच्या रमाबाई नगर परिसरात ही घटना घडली. या तरुणाने विभागातील एका महिलेची छेड काढली होती. ही माहिती समजताच काही स्थानिक तरुणांनी मिळून त्या तरुणाला पकडून बेदम मारहाण करत त्याची अर्धनग्न धिंड काढली. या सर्व प्रकाराचे काहींनी मोबाईलमध्ये चित्रीकरणही केले. स्थानिक तरुणांच्या मारहाणीत हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top