माँटी पानेसरचा यु टर्न निवडणुकीतून माघार


लंडन – इंग्लंड क्रिकेट संघातील माजी फिरकीपटू माँटी पानेसर याने निवडणूक लढविण्याचा निर्णय रद्द केला आहे.माँटी वर्कर्स पार्टी ऑफ ग्रेट ब्रिटन या पक्षातून पश्चिम लंडन मधील एलिंग साऊथहॉल मतदारसंघातून निवडणूक लढविणार होता.
वर्कर्स पार्टीचे नेते जॉर्ज गॅलोवे यांनी गेल्या आठवडयात माँटीच्या उमेदवारीची घोषणा केली होती.मात्र काल सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर करीत माँटीने आपण तूर्त उमेदवारी माजी घेत असल्याचे जाहीर केले.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही ब्रिटिश वृत्तपत्रांनी माँटीच्या मुलाखती घेतल्या होत्या. या मुलाखतींमध्ये माँटीला ब्रिटनचे नाटो सदस्यत्व आणि काही आंतरराष्ट्रीय राजीय घडामोडींबद्दल भूमिका मांडण्यास सांगण्यात आले. मात्र माँटीला त्याची उत्तरे समाधानकारक रित्या देता आली नाहीत.त्यामुळे माँटी खजील झाला होता.त्यामुळेच त्याने निवडणुकीतून माघार घेतली असावी,असे बोलले जाते.
मला क्रिकेटच्या माध्यमातून देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. आता राजकारणाच्या माध्यमातून लोकांची सेवा करावी असे मला वाटले. पण आता असे वाटते की या क्षेत्रासाठी मी खूप नवखा आहे. मला थोडे थांबावे लागेल,असे माँटीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top