माजी मुख्यमंत्री गेहलोत यांना कोरोना व स्वाइन फ्लूची लागण

जयपूर

राजस्थानचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांना कोरोना आणि स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. २०१९ मध्ये जगभरात हाहाकार माजवणारा कोरोनाला आजही अनेक जण बळी पडत आहेत. गेहलोत यांची यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. त्यानंतर त्यांनी वैद्यकीय चाचण्या केल्या. या चाचण्यांमध्ये त्यांना कोरोना आणि स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे समजले.

माजी मुख्ममंत्री गेहलोत यांची एकाच वेळी कोरोना आणि स्वाइन फ्लूची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या सूचनेनुसार गेहलोत सध्या गृह अलगीकरणामध्ये आहेत. याबाबत माजी मुख्यमंत्री गेहलोत यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर माहिती दिली आहे. यामध्ये गेहलोत यांनी म्हटले आहे की, ‘गेल्या काही दिवसांपासून ताप असल्याने आज डॉक्टरांच्या सल्ल्याने वैद्यकीय चाचणी केली. ज्यामध्ये कोरोना आणि स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यामुळे मला पुढील ७ दिवस कोणालाही भेटता येणार नाही. या बदलत्या हवामानामुळे अनेक जण आजारी पडत आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी देखील आपल्या आरोग्याची काळजी घ्या.’

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top