माझं चुकलं, मला माफ करा ! नेतान्याहूकडून हेरखात्याची माफी

जेरूसलेम – मित्रपक्ष आणि विरोधकांकडून तीव्र टीकेचा सामना करत असलेले इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आपल्या एका जुन्या विधानाबद्दल गुप्तचर विभागाच्या प्रमुखांची माफी मागितली आहे. ते म्हणाले की, मी चुकलो, मी ज्या गोष्टी बोललो त्या बोलायला नको होत्या त्या बोललो. म्हणून मी माफी मागतो. मी सर्व सुरक्षा दलांच्या प्रमुखांना पाठिंबा देतो.

७ ऑक्टोबर रोजी हमासचा हल्ला रोखण्यात सुरक्षा यंत्रणा अपयशी ठरल्याबद्दल नेतान्याहू यांनी ठपका ठेवला होता.पण आता बेंजामिन नेतन्याहू यांनी सोशल मीडियावरुन त्यांच्या जुन्या वक्तव्याची पोस्ट काढून टाकली आहे. ते म्हणाले की, ”मी सुरक्षा दलांच्या सर्व प्रमुखांना पूर्ण पाठिंबा देतो. मी इस्रायली सैन्याचा चीफ ऑफ स्टाफ आणि कमांडर म्हणून सैनिकांना पाठिंबा देतो, जे इस्रायलसाठी लढत आहेत.” यापूर्वी नेत्यान्याहू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून म्हटले होते की, ‘त्यांना हमासच्या हल्ल्यासंबंधी माहिती देण्यात आली नाही. शिन बेट या गुप्तचर संस्थेच्या प्रमुखासह सर्व सुरक्षा दलांचे असे मत होते की, हमास भयभीत असून तिला तडजोड करायची होती.’ मात्र, त्यांच्या या वक्तव्यावर सडकून टीका झाली. यानंतर त्यांनी पोस्ट डिलीट केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top