माटुंग्याच्या मरूबाई मंदिरात २२ रोजी महा नवचंडी यज्ञ

मुंबई- माटुंगा येथील ३०० वर्षांच्या पुरातन श्री मरुबाई गावदेवी मंदिरात अयोध्येतील राम जन्मभूमी उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक महा नवचंडी यज्ञाचे आयोजन केले आहे.

सोमवार २२ जानेवारी रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत हा महा नवचंडी यज्ञ होणार आहे.त्यानंतर दुपारी १ ते २ यावेळेत भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे.या सोहळ्यातील संकल्प पूजा केली आणि अन्नदान निधी म्हणून एक हजार रुपये आकारण्यात येणार आहे. या सोहळ्याचे ऑनलाइन लाईव्ह प्रक्षेपण केले जाणार आहे.तरी परिसरातील भाविकांनी या संपूर्ण सार्वजनिक महा नवचंडी यज्ञ सोहळ्याचा लाभ घ्यावा असे,असे आवाहन श्री मरूबाई गावदेवी मंदिर देवस्थानचे विश्वस्त अनिल गावंड यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top