माथेरानमध्ये केवळ तीनच ई रिक्षा सुरु

माथेरान

माथेरानमध्ये सातपैकी केवळ तीनच ई-रिक्षा सुरु आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. केवळ तीनच ई रिक्षा असल्याने विद्यार्थी, स्थानिक नागरिक आणि पर्यटक यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे माथेरानमधील ई रिक्षांची संख्या वाढवली जावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नगपालिकेने २६ डिसेंबरपासून पुन्हा माथेरानमध्ये ई रिक्षा सुरु केल्या. मात्र या रिक्षांमध्ये वांरवार बिघाड होत आहे. त्यामुळे आता माथेरानमध्ये केवळ तीनच ई रिक्षा धावत आहेत. याप्रकरणी माथेरान शहर भाजपाच्या महिला अध्यक्षा सुहासिनी शिंदे यांनी पालकमंत्री उदय सामंत यांनी तात्काळ लक्ष देण्याची मागणी केली आहे. सुहासिनी शिंदे यांनी सांगितले की, माथेरानमध्ये ४० ई रिक्षा सुरु करण्यात याव्यात असा प्रस्ताव सनियंत्रण समितीकडे मांडण्यात आला होता. मात्र समितीच्या काही सदस्यांनी या प्रस्तावाला विरोध केला. त्यानंतर २० ई- रिक्षा हात रिक्षाचालकांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी वीस ई-रिक्षा तात्काळ सुरू करण्याच्या दृष्टीने सनियंत्रण समितीला आदेश द्यावेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top