माथेरानमध्ये धावणार मिनीबस ३५ सीटच्या बसची केली चाचणी

माथेरान – अशोक लेलँड कंपनीची ३५ सीटर बस पुर्ण सीट घेऊन नुकतीच नेरळ-माथेरान घाटात या बसची चाचणी घेण्यात आली.त्यामुळे आता माथेरानमध्ये लवकरच मिनी बस धावू शकणार आहे. कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी गेल्या महिन्यात येथील विकास कामासंदर्भात माथेरानला आढावा बैठक घेतली होती. यावेळी नवीन दोन मिनी बसची मागणी मनोज खेडकर यांनी आमदार महेंद्र थोरवे याच्याकडे केली होती.

या पार्श्वभूमीवर रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या मंत्रालयातील दालनात विशेष बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत मंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना डी.पी.सी मधून एक नवीन बस खरेदी करण्यास सांगितले होते.त्याचाच एक भाग म्हणून काल शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता नेरळ – माथेरानसाठी अशोक लेलँड कंपनीची ३५ सीटर बस पूर्ण सीट घेऊन नेरळ-माथेरान घाटात या बसची चाचणी घेण्यात आली.

या पूर्वीची टाटा कंपनीची जी मिनी बस नेरळ माथेरान घाटात सूरू होती.त्या बसची नव्याने निर्मिती बंद झाल्यामुळे त्याला पर्यायी कोणती मिनी बस उपयुक्त होईल. या सर्व गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी ही अशोक लेलँड कंपनीच्या बसची या घाटरस्त्यात चाचणी घेण्यात आली. ही बस घाटात कशी चालते , इंजिन त्या क्षमतेचे आहे का, या सर्व गोष्टीचा या वेळी अभ्यास करण्यात आला.यावेळी मेकॅनिक इंजिनियर ऑपरेशन पेणचे पंकज धावरे मोहिते, मेकॅनिक इंजिनियर कुर्ला, अशोक लेलँडचे इंजिनियर, व अधिकारी वर्ग उपस्थित होते.या बसचा चाचणी अहवाल मुंबई कार्यालयाला देण्यात येईल त्यानंतर बस बाबतचा अंतिम निर्णय होऊन नेरळ माथेरान नवीन बस धावू शकणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top