मानवी तस्करीच्या संशयातून फ्रान्सने भारतीय प्रवाशांचे विमान जप्त केले

पॅरिस- भारतीय नागरिकांना घेऊन मध्य अमेरिकेतील निकाराग्वा येथे जाणारे विमान फ्रान्सने रोखले. या विमानात ३०३ भारतीय नागरिक होते. या विमानाचा मानवी तस्करीसाठी वापर केला जात असल्याचा संशय फ्रेंच यंत्रणेने ही कारवाई केली. एका निनावी सूचनेवरून हे विमान ताब्यात घेण्यात आल्याचे एका फ्रेंच वकिलांनी सांगितले.
फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी दावा केला की, भारतातून निकाराग्वाला जाणारे विमान मानवी तस्करीसाठी वापरले जात आहे अशी माहितीआम्हाला मिळाली. या विमानाने संयुक्त अरब अमिरातीहून उड्डाण केले होते. हे विमान रोमानियन चार्टर कंपनीचे आहे. या प्रवाशांच्या हेतूंबाबत न्यायालयीन चौकशी सुरू केली आहे. मानवी तस्करीच्या संशयावरून अधिकारी तपास करत होते. निकाराग्वा हा मध्य अमेरिकन देश आहे. निकाराग्वाच्या उत्तरेस होंडुरास, पूर्वेस कॅरिबियन, दक्षिणेस कोस्टा रिका आणि पश्चिमेस प्रशांत महासागर आहे. बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश करणाऱ्यांसाठी हा देश नंदनवन मानला जातो. दरवर्षी हजारो अवैध स्थलांतरित या देशातून अमेरिका-मेक्सिको सीमेवर पोहोचतात. बेकायदेशीर स्थलांतरितांनाही या मार्गावर अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. भौगोलिक स्थान आणि चोरी, दरोड्यासारख्या घटनांचा यात समावेश आहे. निकाराग्वामध्ये या स्थलांतरितांवर अधिक तपास केला जात नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top