मान्याची वाडीत एका दिवसात १०० टक्के ऑनलाइन करवसुली

ढेबेवाडी – पाटण तालुक्यातील ढेबेवाडी खोर्‍यात असलेल्या मान्याची वाडी या आदर्श गावाने आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक वेगळी आदर्शवत कामगिरी केली आहे.या गावाने एकाच दिवशी १०० टक्के ऑनलाइन करभरणा केला आहे.त्यासाठी क्यू आर कोडचा वापर करून घरी बसूनच सर्व प्रकारचे वार्षिक कर भरले आहेत.

या मान्याचीवाडी आदर्श गावाचे सरपंच रवींद्र माने यांनी सांगितले की,आमची ग्रामपंचायत ग्रामस्थांना सर्व सुविधा विनाअडथळा पुरवत असते.गावामध्ये वीज,पाणी,आरोग्य आणि शिक्षण यावर विशेष भर देऊन गावात विविध उपक्रम राबविले जातात. त्यामुळे सर्व ग्रामस्थ पहिल्या दिवशीच कर भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करत असतात. गेली २३ वर्षे १०० टक्के करवसुली परंपरा सुरू आहे. ग्रामपंचायतीकडे खातेदारांकडून आरोग्य कर,वीज कर,पाणीपट्टी, व्यवसाय कर आणि घरफळा आदींची कराच्या माध्यमातून वसुली केली जाते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top