वॉशिंग्टन – संगणक क्षेत्रातील दिग्गज मायक्रोसॉफ्ट या कंपनीने कृत्रिम बुध्दिमत्ता (एआय) तंत्रज्ञानावर आधारित व्हिएएसए-१ हे मॉडेल विकसित केले आहे. या तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य़ म्हणजे छायाचित्र आणि ध्वनिफित यांचे मिश्रण करून ते छायाचित्र बोलके करता येते. हे सर्व काही एवढे हुबेहूब केले जाते की, छायाचित्रातील व्यक्ति खरोखरच बोलत आहे असा भास होतो. त्या व्यक्तीचे चेहऱ्यावरील हावभाव आणि बोलताना होणारी ओठांची हालचाल शब्दानुरूप हुबेहूब टिपली जाते.