मायावतींनी भाचा आकाश आनंद यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले

लखनौ

उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर बसपा प्रमुख मायावती यांनी त्यांचे भाचे आकाश आनंद यांना पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले. बसपाच्या उत्तराधिकारीपदाची जबाबदारीही आकाश आनंद यांच्याकडून काढून घेतली आहे. याबाबतची माहिती मायावतींनी एक्स पोस्टच्या माध्यमातून करून दिली आहे.

“बहुजन समाज पक्ष हा एका राजकीय पक्षासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आत्मसन्मान, स्वाभिमान आणि सामाजिक परिवर्तनाची एक चळवळ आहे. त्यासाठी बसपाचे संस्थापक काशीराम आणि मी स्वत: संपूर्ण जीवन समर्पित केले आहे. तसेच त्याला गती देण्यासाठी नव्या पिढीलाही तयार करण्यात येत आहे. यामध्ये पक्षात, इतर लोकांना पुढे आणण्यासोबतच आकाश आनंद यांना राष्ट्रीय समन्वयक आणि माझा उत्तराधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मात्र पक्ष आणि चळवळीचे व्यापक हित विचारात घेऊन पूर्ण परिपक्वता येईपर्यंत त्यांना या दोन्ही प्रमुख जबाबदाऱ्यांवरून बाजूला करण्यात येत आहे. त्यांचे वडील आनंद कुमार पक्ष आणि चळवळीमध्ये आपली जबाबदारी पूर्वीप्रमाणे बजावत राहतील. बसपाचे नेतृत्व पक्ष आणि चळवळीच्या हितासाठी डॉ. आंबेडकर यांचा वारसा पुढे नेण्यासाठी कुठल्याही प्रकारचा त्याग करण्यापासून मागे हटणार नाही,” असे मायावतींनी आपल्या एक्सपोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, मायावतींनी गेल्या वर्षी भाचा आकाश आनंद यांना आपले उत्तराधिकारी म्हणून नियुक्त केले होते लोकसभा निवडणुकीदरम्यान सीतापूर येथे एका सभेत आकाश आनंद यांनी आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याप्रकरणी त्यांच्यासह इतर चार जणांविरोधात आचारसंहिता उल्लंघनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या विधावसभा निवडणुकीवेळी मायावती यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले . त्यानंतर त्यांनी भाजपा विरोधी विधान करणे टाळले . मात्र आता निवडणूक प्रचारात भाचा आनंद हा भाजपाच्या विरोधात वक्तव्य करीत होता . भाजपा ही तालीबानी संघटना आहे असेही त्याने म्हटले . त्यानंतर आता आकाश आनंद यांना पदावरून हटवण्याचा निर्णय मायावतींनी घेतला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top