मालदीव राष्ट्रपतींच्या हट्टामुळे भारतीय चिमुकल्याचा बळी ?

  • मुइज्जूंनी एअरलिफ्टला
    परवानगी दिली नाही!

माले – भारत आणि मालदीव यांच्यातील तणावामुळे एका १४ वर्षीय मुलाच्या जीवावर गेल्याची घटना समोर आली आहे.यावरून मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांच्यावर गंभीर आरोप केला जात आहे. काल शनिवारी मालदीवमध्ये एका १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. त्याला एअरलिफ्ट करण्यासाठी भारताने दिलेले डोर्नियर विमान वापरण्यास परवानगी न दिल्याने हे घडल्याचे मालदीवच्या स्थानिक मीडियाने म्हटले आहे. राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी घातलेल्या बंदीमुळे विमान उपलब्ध होऊ शकले नाही.

एका अल्पवयीन मुलाला ब्रेन ट्युमरचा त्रास होता.त्याला अचानक ब्रेन स्ट्रोक आल्यामुळे प्रकृती बिघडली होती.मुलाच्या कुटुंबियांनी गैफ अलिफ विलिंगिली येथे असलेल्या घरून त्याला घेऊन जाण्यासाठी मालेहून एका एअर अॅम्ब्युलन्स पाठवण्याची आयलँड एव्हिएशनला फोन केला.पण त्यांनी आमच्या कॉलला उत्तर दिले नाही. गुरुवारी सकाळी ८.३० वाजता आम्हाला उत्तर मिळाले. एअर अॅम्ब्युलन्सना आपत्कालीन स्थितीत विनंतीनंतरही १६ तासांनी मुलाला माले इथे आणले. परंतु त्याचे निधन झाले.

दरम्यान,एअर अॅम्ब्युलन्सच्या कंपनीने म्हटले की,आम्ही तत्काळ प्रक्रिया सुरू केली होती.पण अखेरच्या क्षणी उड्डाणात तांत्रिक अडचणींमुळे उड्डाण करता आले नाही.मालदीवच्या लोकांना मदत करण्यासाठी भारताने दोन अ‍ॅडव्हान्स लाइट हेलिकॉप्टर,एक डॉर्नियर विमान आणि ऑफशोअर पॅट्रोलिंग जहाज दिले आहे. यामध्ये हेलिकॉप्टर आणि विमानांचा वापर एअर अँम्ब्युलन्स म्हणून केला जातो.पण मुइज्जू यांनी राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून त्यावर बंदी घातली आहे, असे म्हटले जात आहे. त्यामुळे मालदीव सरकारच्या आदेशाशिवाय ही विमाने आणि हेलिकॉप्टर वापरली जाऊ शकत नाहीत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top