मालेगावमध्ये २ दिवसपाणी पुरवठा खंडित

नाशिक :

जिल्ह्यातील मालेगाव शहराचा शनिवारी (२० जानेवारी) आणि रविवारी (२१ जानेवारी) पाणीपुरवठा खंडित होणार आहे. मालेगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गिराणा पंपिंग स्टेशन जवळील एक्स्प्रेस फिडर वरील तातडीने काम करण्यासाठी वीज पुरवठा खंडित होणार आहे.

गिरणा पंपिंग स्टेशन वरील वीज पुरवठा सुमारे ८ तास खंडित होणार असल्याने मालेगाव महापालिका क्षेत्रात प्रशासनाला शटडाऊन करावे लागत असल्याने शनिवारी आणि रविवारी असे २ दिवस पाणीपुरवठा खंडित होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top