मावळमध्ये प्रचारासाठी आलेला गोविंदा उमेदवाराचे नावच विसरला

मावळ

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचा प्रचार सध्या जोरदार सुरु आहे. नुकताच शिंदेसेनेत प्रवेश केलेला बॉलीवूड अभिनेता गोविंदा मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी आला होता. यावेळी तो उमेदवाराचे नावच विसरला. अखेर भाजपा आमदार उमा खापरे यांनी गोविंदाला उमेदवाराचे नाव सांगितले. हे दृश्य माध्यमांच्या कॅमेर्यात कैद झाले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याची चर्चा रंगली.

श्रीरंग बारणे यांच्या रोड शोसाठी गोविंदा काल मावळ लोकसभेत आला होता. त्यावेळी पत्रकार परिषदेत गोविंदा उपस्थितांची नावे घेऊ लागला. पण ज्यांच्या रोड शोसाठी तो आला होता, ते श्रीरंग बारणे त्यांच्या शेजारीच बसले होते. गोविंदाला त्यांचे नाव आठवत नव्हते. यामुळे तो काही क्षण अडखळला. अखेर उमेदवारी दिली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top