मिझोराममध्ये भूकंपाचे धक्के

ऐझवाल

मिझोराममध्ये सकाळी ७.१८ वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ३.५ रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाचा केंद्र लुनलेईमध्ये जमिनीपासून १० किलोमीटर खोलीवर होते, अशी माहिती राष्ट्रीय भूंकप विज्ञान केंद्राने दिली. त्रिपुराच्या काही भागातही या भूकंपाचे धक्के जाणवले. तसेच शेजारील देश म्यानमारच्या काही भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपामध्ये कोणतीही जिवित किंवा वित्तहानी झाली नाही. दरम्यान, बुधवारी मणिपूरमध्ये देखील भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top