मिनिकॉय बेटावरील नौदलांच्या तळाचे ६ मार्चला उद्घाटन

नवी दिल्ली- लक्षद्वीप समूहातील मिनिकॉय बेटावर भारतीय नौदलाच्या स्वतंत्र तळाची स्थापना केली जात आहे. नौदलप्रमुख अडमिरल आर. हरी कुमार यांच्या हस्ते ६ मार्चला या स्वतंत्र तळाचे उद्घाटन केले जाणार आहे. आयएनएस जटायू असे नौदलांच्या या स्वतंत्र तळाचे नाव असेल. या तळाद्वारे प्रदेशातील व्यापारी मार्ग, चीनच्या हालचाली आणि सागरी चाच्यांवर लक्ष ठेवणे अधिक सोपे होणार आहे.
लक्षद्वीपमधील कवरत्ती बेटावरील जटायू येथे पूर्वीपासूनच नौदलाचे एक तळ कार्यरत आहे. आयएनएस द्वीपरक्षक असे या नौदल तळाचे नाव आहे. आता मिनिकॉय बेटावर नौदलाच्या स्वतंत्र तळाची स्थापना केली जात आहे. भारताच्या शेजारील देशांत आणि समुद्रात चीनच्या वाढत्या कारवाया वाढत आहेत. या वाढत्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाने या प्रदेशातील मोर्चेबंदी अधिक भक्कम करण्याचा निर्णय घेतला आहे. मिनिकॉय हे लक्षद्वीपचे सर्वात दक्षिणेकडील बेट आहे. आवश्यक पायाभूत सुविधा आणि संसाधनांसह स्वतंत्र नौदल तळाची स्थापना केल्याने बेटांवर भारतीय नौदलाची एकूण परिचालन क्षमता वाढेल. यामुळे भारतीय नौदलाची क्षमता वाढेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top