मिमिक्री कलाकार श्याम रंगीला वाराणशीतून लोकसभा लढणार

लखनौ- प्रसिध्द मिमिक्री आर्टिस्ट श्याम रंगीला यांनीदेखील निवडणुकीत एन्ट्री केली आहे. श्याम रंगीला वाराणसी लोकसभा मतदरासंघातून लोकसभा लढणार आहेत. त्यांनी त्यांच्या सोशल मिडीया अकाऊंटवरून याची माहिती दिली आहे. श्याम रंगीला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिमिक्री केली होती. या मिमिक्रीमुळे ते लोकप्रिय झाले होते. मात्र आता श्याम रंगीला पंतप्रधान मोदींच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. श्याम रंगीला यांनी सोशल मिडीया अकाऊंटवर लिहिले आहे की, ‘ मी वाराणसीतून आणि पंतप्रधान मोदींच्या विरोधात निवडणूक लढवणार आहे. लोकशाही जिवंत राहावी यासाठी मी हे करत आहे. वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदींच्या विरोधात उमेदवार नाही. म्हणून मला लोकांना एक पर्याय द्यायचा आहे. या आठवड्यात मी वाराणशीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करेन.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top