मीरा बोरवणकरांची ‘ती’ पुस्तके बाजारातून गायब

मुंबई- माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी आपल्या ‘ मॅडम कमिशनर’ नावाच्या पुस्तकात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कथित येरवडा जमीन घोटाळ्याबाबत आरोप केले आहेत. तसेच इतरही अनेक राजकीय गौप्यस्फोट केले असल्यामुळे या पुस्तकाची मागणी वाढली आहे. परंतु हे पुस्तक बाजारात सध्या उपल्बधच नाही. तसेच त्यांनी काही वर्षांपूर्वी लिहिलेल्या ‘माझ्या आयुष्याची पाने’ हे पुस्तकसुद्धा बाजारात मिळेनासे झाले आहे. मीरा बोरवणकर यांच्या या दोन्ही पुस्तकाची मागणी वाढत चालली असून अनेकांनी ऑनलाईन पध्दतीने ही पुस्तके मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र ती उपलब्ध नसल्याचे नसल्याचे अनेक वाचकांचा अनुभव आहे. ‘मॅडम कमिशनर ‘ या पुस्तकात त्यांनी आपल्या पोलीस खात्यातील काही अनुभव कथन केले आहेत. येरवडा पोलीस ठाण्याच्या कथित जमीन घोटाळ्याबाबत लिहिताना त्यांनी अजित पवार यांच्या नावाचा उल्लेख न करता आरोप करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. या आरोपांमुळे वाचकांची उत्कंठा वाढली असून बाजारात पुस्तकाची मागणीही वाढली आहे. पण बाजारात कुठेच हे पुस्तक उपलब्ध नाही. त्यामुळे पुस्तकाच्या दुसर्या आवृत्तीची वाट पाहिली जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top