मुंबईच्या रे रोड येथे गोदामाला भीषण आग

मुंबई :

दक्षिण मुंबईतील रे रोड परिसरातील दारुखाना येथे असलेल्या गोदामाला गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण गोदाम जळून खाक झाले आहे. मात्र, या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्नीशमन दलाकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते.

रे रोड परिसरातील दारुखाना, ब्रिटनिया कंपनी शेजारी असलेल्या देवीदयाळ कंपाऊंड येथे तळमजला आणि एकमजली गोदाम होते. या गोदामाला आज सकाळी आग लागली. सुरुवातीला ही आग छोटी होती. पण काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. आगीमुळे संपूर्ण दारुखाना परिसरात धुराचे लोट पसरले होते. त्यानंतर या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले. त्याचसोबत स्थानिक पोलीस, महापालिका वार्ड स्तरावरील यंत्रणा, बेस्ट उपक्रम आदी यंत्रणा आणि रुग्णवाहिका यांची व्यवस्था करण्यात आली होती. आग भीषण स्वरूपाची असल्याने आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top