मुंबईच्या सीमेवरील टोलनाके २०२७ पर्यंत सुरूच राहाणार

मुंबई :

वाशी, दहीसर, ऐरोली, आनंदनगर आणि एल. बी. एस मुलूंड या मुंबईच्या प्रवेशद्वारावरील टोलनाक्यांवरील टोलवसुली ३० सप्टेंबर २०२७ पर्यंत सुरूच राहणार आहेत. २००२ पासून २५ वर्षांच्या कालावधीसाठी टोलवसुलीचे हक्क दिल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) विधानपरिषदेत दिली. त्यामुळे आणखी जवळजवळ चार वर्षे वाहनचालकांची टोलवसूलीतून मुक्तता होणार नाही,

एमएसआरडीसीने उभारलेल्या ५५ पुलाचा खर्च वसूल करण्यासाठी मुंबईच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या ५ टोल नाक्यांवर पुलांचा खर्च वसूल होऊनही अद्याप टोल वसुली सुरू असून त्यात दरवाढ करण्यात आली आहे का, ‘असा प्रश्न काल विधानपरिषदेत विरोधकांनी उपस्थित केला. त्यावर मंत्री दादा भुसे यांनी उत्तर दिले की, मुंबई अतिरिक्त टोल वसुली सुरू आहे. मुंबईतल्या ५५ उड्डाणपुलासाठी १ हजार २५९.३८ कोटी इतका खर्च झाला होता. २०२६ पर्यंत ३ हजार २७२ कोटी वसुल होणार आहे.

टोलच्या मुद्यावर मनसेने आंदोलन केले होते. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन याबाबत चर्चाही केली होती. त्यानंतर राज ठाकरे यांच्या निवासस्थानी राज्याचे मंत्री दादा भुसे आणि सरकारचे अधिकारी यांच्यात टोलबाबत काही सूचनांची अंमलबजावणी करण्यात आली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top