मुंबईतील आठ चौपाट्यांवर उभारणार फिरती स्वच्छतागृहे

मुंबई- देशातील सर्वांत जास्त लोकसंख्येचे शहर असलेल्या मुंबईत दररोज हजारो पर्यटक येत असतात. मुंबईतील समुद्र किनारे पर्यटकांचे खास आकर्षण असते.त्यामुळे त्यांच्यासाठी
मुंबईतील ८ चौपाट्यांवर सोयीसुविधांसह पालिका प्रशासन २४ फिरती शौचालये उभारली जाणार आहेत.विशेष म्हणजे या शौचालयांमध्ये दिव्यांग आणि वृद्धांसाठी लोव्हर प्लॅटफॉर्मची सुविधा उपलब्ध असणार आहे,अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली.

समुद्र किनारी ८ चौपाट्यांवर उभारल्या जाणार्‍या शौचालयांमध्ये सोलर पॅनलही बसविले जाणार आहे. या उपक्रमासाठी मुंबई महापालिका ३ कोटी ४२ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.यामध्ये प्रत्येक शौचालयात महिलांसाठी ३,पुरुषांसाठी ३ आणि दिव्यांग व्यक्तींसाठी १ याप्रमाणे ७ शौचकुपांची सुविधा असणार आहे. पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने हे स्वच्छतागृह बांधणीचे काम हाती घेतले आहे.एकूण २४ फिरत्या स्वच्छतागृहांमध्ये गिरगाव-२,दादर-४,माहीम-४,वर्सोवा-४,मढ – मार्वे – १, मनोरी- गोराई-१ असा समावेश आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top