मुंबईतील पूर्व मुक्त मार्गासाठी पालिका ३८ कोटी खर्च करणार

मुंबई – मुंबईच्या पूर्व उपनगरांना दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कुलाबा आदी स्थानांसोबत एका जलद दुव्याने जोडण्यासाठी ईस्टर्न फ्री-वे अर्थात पूर्व मुक्त मार्ग तयार केला आहे.याच पूर्व मुक्त मार्गासाठी मुंबई महापालिका ३८ कोटी रुपये खर्च करणार आहे.या मार्गाच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी हा खर्च केला जाणार आहे.

एमएमआरडीएने पालिकेकडे हस्तांतरित केलेल्या ईस्टन फ्री वे या पुलाच्या खांबावरील पेडेस्टलमध्ये तडे आढळल्याने बेअरिंग बदलण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
ईस्टन फ्री महामार्गाचे बांधकाम एमएमआरडीने २०१४ मध्ये पूर्ण केले. या इस्टर्न फ्री वेच्या कामांसाठी एमएमआरडीएने बांधलेल्या सिम्प्लेक्स इन्फास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीची निवड केली.या कंपनीने काम पूर्ण करून दिल्यानंतर मे २०१५ मध्ये पूर्व मुक्त मार्ग एमएमआरडीएने जेथे आहे जसा आहे, या तत्त्वावर पालिकेला दैनंदिन देखभाल व दुरुस्तीसाठी हस्तांतरित केला होता. ईस्टर्न फ्री-वे ज्या शहर भागातून जात आहे, त्या भागाचे महापालिकेच्या पूल विभागाने सर्वेक्षण केले, तेव्हा पुलाच्या खांबावरील पेडेस्टेलचे नुकसान झाल्याचे आढळून आले.

या पुलाच्या बांधकामासाठी मॉरर सॅनफिल्ड इंडिया लिमिटेड या कंपनीची नेमणूक करण्यात आली असून यासाठी कंत्राटदाराने उणे २५ टक्के दराने बोली लावत विविध करांसह ३८.३१ कोटी रुपयांमध्ये हे मिळवले आहे. पावसाळा वगळून १८ महिन्यांमध्ये या इस्टर्न फ्री-वेच्या दुरुस्तीचे काम केले जाणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top