मुंबईतील ३ हजार एकरचा मोक्याचा भूखंड! जमशेट-स्मिता गोदरेज यांच्या वाट्याला

मुंबई – उद्योगपती गोदरेज कुटुंबाने विभक्त होण्याचा निर्णय घेतला असून समूहाचे दोन भागांत विभाजन होणार आहे. मंगळवारी उशिरा याबाबतचा करार झाल्याचे समजते. या करारानुसार समुहाच्या मालकीच्या भूखंडांवर बांधकामाचे पूर्ण हक्क जमशेटजी नवरोज गोदरेज आणि त्यांच्या भगिनी स्मिता कृष्णा गोदरेज यांच्या मालकीच्या गोदरेज अँड बॉयस कंपनीच्या वाट्याला आले आहेत. विशेष म्हणजे, या भूखंडामध्ये मुंबईतील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या ३ हजार एकरच्या भूखंडाचा समावेश आहे.कंपनीच्या वतीने बाजार नियामक सेबीला दिलेल्या माहितीचा हवाला देत सुत्रांनी ही माहिती दिली आहे.
गोदरेज कुटुंबियांमध्ये झालेल्या करारानुसार उद्योगसमुहाचे दोन भाग झाले आहेत. त्यापैकी एक भाग ज्यामध्ये उद्योग समूहातील नोंदणीकृत कंपन्या आहेत अदी गोदरेज आणि त्यांचे बंधू नादिर यांच्या वाटयाला तर एक भाग ज्यामध्ये गोदरेज समुहाच्या मालकीच्या जमिनी आहेत त्यांची चुलत भावंडे जमशेट आणि स्मिता गोदरेज यांच्या वाट्याला आला आहे.
अदी आणि नादीर यांच्या वाट्याला गोदरेज इंडस्ट्रीज लि., गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्टस लि., गोदरेज प्रॉपर्टीज लि., गोदरेज अॅग्रोव्हेट लि. आणि अॅस्टेक लाईफ सायन्सेस लि. या कंपन्या आल्या आहेत. ७५ वर्षीय जमशेट गोदरेज हे गोदरेज एन्टरप्रायझेसचे अध्यक्ष असतील. गोदरेज एन्टरप्रायझेसमध्ये गोदरेज अँड बॉयस मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचा समावेश आहे. ही कंपनी विविध उद्योग क्षेत्रांमध्ये अग्रणी आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top