मुंबईत आज तिन्ही रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक

मुंबई –
उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी उद्या रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे – कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. ब्लाॅक कालावधीत ठाणे ते कल्याणदरम्यान जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.
हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाऊन डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.४० पर्यंत मेगाब्लॉक असेल. या कालावधीत सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे, सीएसएमटी-वाशी/बेलापूर/पनवेल, सीएसएमटी-वांद्रे/गोरेगाव अप आणि डाऊन रेल्वे मार्गावरील लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला फलाट क्रमांक ८ वरून दर २० मिनिटांनी विशेष लोकल सेवा चालवण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वेवर शनिवारी मध्यरात्री १२ ते रात्री ३.३० वाजेपर्यंत वसई रोड ते भाईंदर अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे जलद मार्गावरील सर्व लोकल विरार ते बोरिवली स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top