मुंबईत मैला वाहून नेणारे टँकर रस्ते धुण्याच्या कामाला

मुंबई – हवेतील प्रदूषणाचा स्तर कमी करण्यासाठी आणि मुंबई मधील हवेचा स्तर उंचावण्यासाठी रस्ते धुण्याची कल्पना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्यात उतरवली खरी.. पण आता मैला वाहुन नेणारे टँकर रस्ता धुण्याच्या कामाला वापरले जात असल्याने मुंबईच्या आर वॉर्डमध्ये मैला वाहून नेण्यासाठी 10-10 दिवस टँकरच येत नसल्याने कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागातील नागरिकांना 500 रुपयाहून जास्त पैसे टँकरवाल्यांना देऊन आपल्या भागात टँकर यावा म्हणून विनवण्या कराव्या लागत आहेत.

मुंबईत सी पी टँकरचा वापर सेप्टिक टँकमधील गाळ म्हणजे मैला साफ करण्यासाठी केला जातो. रस्ता धुण्यासाठी हे टँकर वापरले जात नाहीत. आर नॉर्थ वॉर्डमध्ये 2 सी पी टँकर आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार एक टँकर रस्ते धुण्यासाठी वापरला जातो. तर फक्त एकच गाळ साफ करण्यासाठी उपलब्ध आहे. त्यामुळे टँकरसाठी प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागत आहे. या परिस्थितीत टँकर माफिया बोली लावून लोकांना लुटतात. सर्वाधिक बोली लावणाऱ्याला प्रथम टँकर मिळतो. सिवरेज लाईन नसलेल्या झोपडपट्टी भागात असे टँकर सर्रास वापरले जात असल्याने पर्याय नसलेल्यांनाना टँकर माफियांना पैसे द्यावेच लागतात. एका टँकर भेटीचे दर 500 ते 1000 रुपयांपर्यंत आहेत. एक सेप्टिक टाकी रिकामी करण्यासाठी सरासरी किमान 8-10 टँकर आणावे लागतात.त्यामुळे गरीब झोपडपट्टीवासीयांना प्रति सेप्टिक टाकी साफसफाईसाठी 4000-10000 च्या दरम्यान खर्च करावा लागतो. सेप्टिक टाकीची साफसफाई करण्यात अयशस्वी झाल्यामुळे रस्त्यावरील गाळ ओसंडून वाहतो आणि आरोग्यास गंभीर धोका निर्माण होतो.महानगर पालिका अधिकाऱ्यांकडे टँकर पाठवा म्हणून सतत मागणी केल्यास ते मुख्यमंत्र्यंचा आदेश दाखवतात. एकूणच मैला पडून राहू दे, पण रस्ते धुतले गेले पाहिजेत ही भूमिका सध्या महानगरपालकेने घेतली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top