Home / News / मुंबईत लोखंडवाला कॉम्पलेक्सला आग! ३ मृत्यू

मुंबईत लोखंडवाला कॉम्पलेक्सला आग! ३ मृत्यू

मुंबई- लोखंडवाला कॉम्प्लेक्सच्या रिया पॅलेस १४ मजली इमारतीच्या १०व्या मजल्यावर सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. या आगीत ३ जणांचा होरपळून मृत्यू झाला. चंद्रप्रकाश सोनी (७४), कांता सोनी (७४) आणि पेलुबेता (४२) अशी मृतांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहचून आग विझवण्याचे काम सुरु केले. १ तासाच्या अथक परिश्रमानंतर सकाळी९ वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र या आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.