मुंबईत हवाई दलाचा चित्तथरारक एअर शो

मुंबई – भारतीय हवाई दलाच्या वतीने मुंबईत सध्या एअर शो सुरू आहे. या एअर शोमध्ये लढाऊ विमानांच्या चित्तथरारक हवाई कसरती मुंबईकरांचे लक्ष वेधून घेत आहेत. १२ जानेवारीपासून हा तीन दिवसीय एअर शो सुरू झाला असून आज त्याचा दुसरा दिवस होता.

हा एअर शो हवाई दलाच्या सूर्य किरण एरोबॅटिक आणि सारंग एरोबॅटिक या दोन टीमद्वारे मरीन ड्राईव्ह समुद्र किनारी भागात सादर केला जात आहे. भारतीय हवाई दलाच्या क्षमता, कौशल्य आणि व्यावसायिक सफाईदारपणाचे दर्शन घडविणे हा या एअर शोचा उद्देश आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top