मुंबईत ११८ ब्रिटीशकालीन इमारती अतिधोकादायक

मुंबई

मुंबईत अनेक ठिकाणी ब्रिटीशकालीन इमारती आहेत. मुंबई महानगरपालिका पावसाळ्यापूर्वी या इमारतींचे सर्वेक्षण करते. मुंबई महापालिकेने यावर्षी केलेल्या सर्वेक्षणानुसार मुंबईतील ११८ ब्रिटिशकालीन इमारती अतिधोकादायक आहेत. या इमारतीमधील रहिवाशांना स्थलांतरीत होण्याची नोटीस महापालिकेतर्फे बजावण्यात आली आहे.

११८ अतिधोकादायक इमारतींमध्ये पश्चिम उपनगरातील ११४ इमारतींचा समावेश आहे. या इमारती मालाड, बोरिवली, मुलुंड, अंधेरी पश्चिम या शहरातील आहेत. तसेच मुंबई शहरातील २७ इमारती आणि पूर्व उपनगरातील ४७ इमारतींचा देखील अतिधोकादायक इमारतींमध्ये समावेश आहे. पावसाळ्यामध्ये या इमारतींना धोका निर्माण होतो. या इमारती कोसळण्याची शक्यता असते. त्यामुळे या इमारतींमधील रहिवाशांना स्थलांतरित होण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top